नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ९ मार्च) ५३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर: ४११, ग्रामीण: ७१, मालेगाव: ४१ आणि जिल्हा बाह्य १४ असा समावेश आहे. तर कोरोनामुळे नाशिक शहरात ४, मालेगावमध्ये २, ग्रामीणमध्ये ३ मृत्यू झाले आहेत.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: १) फ्लॅट क्र.१३, शुभंक्षा अपार्टमेंट, मखमलाबाद म्हसरूळ नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध महिला, २)फ्लॅट क्र.१, कावेरी अपार्टमेंट, डिसूझा कॉलनी कॉलेजरोड येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष, ३) कृष्णा अपार्टमेंट,चेतना नगर, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष, ४) सातपूर कॉलनी,सातपूर येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष यांचा समावेश आहे.
तर नाशिकमध्ये सध्या ३३५० रुग्ण उपचार घेत आहेत.
![]()

