नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार ४६२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४५७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३८५, बागलाण २०६, चांदवड २२०, देवळा ७७, दिंडोरी ३०६, इगतपुरी ६५, कळवण १४४, मालेगाव १७६, नांदगाव १३६, निफाड ४६५, पेठ १६, सिन्नर ६७७ , सुरगाणा २७, त्र्यंबकेश्वर १०, येवला ८१ असे एकूण २ हजार ९९१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ५२०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १८१ तर जिल्ह्याबाहेरील २० रुग्ण असून असे एकूण ५ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार १४८ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.३१ टक्के, नाशिक शहरात ९७.९३ टक्के, मालेगाव मध्ये ९५.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार ४३० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार १२५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३१९ व जिल्हा बाहेरील १०० अशा एकूण ४ हजार ९७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी दि. ८ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)