जिल्ह्यात आजपर्यंत ३५ हजार ०६६ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ६९१ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३५ हजार ०६६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार ६९१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३८७, चांदवड ८३, सिन्नर ३९४, दिंडोरी ८३, निफाड ५३७, देवळा ९०,  नांदगांव २९७, येवला ८९, त्र्यंबकेश्वर ४२, सुरगाणा ०२, पेठ १०, कळवण २५,  बागलाण २२७, इगतपुरी ९५, मालेगांव ग्रामीण ३३७ असे एकूण २ हजार ६९८  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ३६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६१०  तर जिल्ह्याबाहेरील १६ असे एकूण ७ हजार ६९१  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ४३  हजार ६९०  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७१.९२,  टक्के, नाशिक शहरात ८३.७२ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.३९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.६१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.२६इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २६८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५२६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११५  व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९३३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

(वरील आकडेवारी आज सकाळी दि. ७ सप्टेंबर २०२० ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790