उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ९५८ ने घट; ३४ हजार ०५३ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख २८३ रुग्ण कोरोनामुक्त !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख २८३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३४ हजार ०५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार ९५८ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ६४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ८१९, चांदवड १ हजार २९, सिन्नर २ हजार ३४५, दिंडोरी १ हजार १९५, निफाड १ हजार ८४६, देवळा ९०१, नांदगांव ५०४, येवला ३४८, त्र्यंबकेश्वर २२३, सुरगाणा ४२९, पेठ ९१, कळवण ६४९,  बागलाण १ हजार ३७३, इगतपुरी ३९३, मालेगांव ग्रामीण ८०६ असे एकूण १४ हजार ९५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १७  हजार २५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६१५  तर जिल्ह्याबाहेरील २३५ असे एकूण ३४ हजार ०५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख ३७ हजार ९८१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८६.३० टक्के, नाशिक शहरात ९०.५९ टक्के, मालेगाव मध्ये  ८३.९१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.८४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८८.८५ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार ७०६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ५८५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५६  व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ६४५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. ५ मे २०२१ रोजी प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790