नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि.30 जुलै) 532 पॉझिटिव्ह; शहरात 416 तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० जुलै) एकूण ५३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण १०३, नाशिक शहर ४१६, मालेगाव १३, जिल्हा बाह्य ० अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १२ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ८, मालेगावमध्ये १ तर नाशिक ग्रामीणमध्ये ३ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकूण ४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: 'मोस्ट वॉन्टेड' गुन्हेगाराला क्राईम ब्रांचने केली कॉलेज रोड येथून अटक !

नाशिक शहरात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३९७ एकूण कोरोना  रुग्ण:-८८३७ एकूण मृत्यू:-२७५(आजचे मृत्यू ०८)  घरी सोडलेले रुग्ण :- ६९८६ उपचार घेत असलेले रुग्ण:- १५७६ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हे ही वाचा:  नाशिक: चोपडा लॉन्ससमोर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) म्हाडा कॉलनी, वडाळा गाव नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) घर नंबर २२३२, संभाजी चौक येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) दत्तचौक, सिडको येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) गणेश चौक, नाशिक येथील २८ वर्षीय  पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) शिवाजीनगर, नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ६) मर्चंट बँके जवळ, पवननगर, सिडको येथील ३० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) खांदवे मळा,  सावता नगर, नवीन नाशिक येथील ५८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) हनुमान वाडी, पंचवटी येथील ५९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790