जिल्ह्यात आजपर्यंत ६४ हजार ९८१ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६४ हजार ९८१  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ३३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५३९, चांदवड १२१, सिन्नर ६०७, दिंडोरी २१०, निफाड  ८२०, देवळा १०३,  नांदगांव २२०, येवला ७२, त्र्यंबकेश्वर ११९, सुरगाणा २७, पेठ २३, कळवण ११०,  बागलाण २०६, इगतपुरी १९०, मालेगांव ग्रामीण २६६ असे एकूण ३ हजार ६३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ३६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४७५ तर जिल्ह्याबाहेरील ९७ असे एकूण ७  हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७३ हजार ८८८ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७९.२०,  टक्के, नाशिक शहरात ९१.८५ टक्के, मालेगाव मध्ये ८३.०४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७३.४० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.९५  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४३१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ७२६ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५१ व जिल्हा बाहेरील २८ अशा एकूण १ हजार ३३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. २९ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790