नाशिक जिल्ह्यात सद्य स्थितीत इतके हजार रुग्ण घेत आहेत कोरोनावर उपचार…

नाशिक जिल्ह्यात सद्य स्थितीत इतके हजार रुग्ण घेत आहेत कोरोनावर उपचार…

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८  हजार ४४८  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत १ हजार ०६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १४ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६२४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: "वर्षभराची माझी मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली"; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३९,  बागलाण २१, चांदवड ३२, देवळा ३०, दिंडोरी २६, इगतपुरी ०६, कळवण ०८, मालेगाव १०, नांदगाव ११, निफाड १८४, पेठ ०१, सिन्नर २५०, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०७, येवला ८० असे एकूण ७०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७१,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९  तर  जिल्ह्याबाहेरील ११ रुग्ण असून असे एकूण १ हजार ०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ०७८  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: कार व कंटेनरच्या भीषण अपघातात नाशिकच्या ५ युवकांचा मृत्यू

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०४,  बागलाण ००, चांदवड ०२, देवळा ०३, दिंडोरी ०२, इगतपुरी ०१, कळवण ००, मालेगाव ०१, नांदगाव ०१, निफाड ०६, पेठ ००, सिन्नर २०, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ११ असे एकूण ५१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.८९ टक्के, नाशिक शहरात ९८.१५  टक्के, मालेगाव मध्ये ९७.०६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ इतके आहे.

हे ही वाचा:  अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत: दादा भुसे

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार १६१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९८० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790