नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४७८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ६७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २०८, चांदवड ५१, सिन्नर १६२,दिंडोरी ६५, निफाड १३९, देवळा २४, नांदगांव ५५, येवला ०९, त्र्यंबकेश्वर २३, सुरगाणा ०१, पेठ ००, कळवण २६, बागलाण १४७, इगतपुरी १५, मालेगांव ग्रामीण १२ असे एकूण ९३७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २८०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५९ तर जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण ३ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार ७५३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.६२, टक्के, नाशिक शहरात ९५.३७ टक्के, मालेगाव मध्ये ९२.५८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ७२१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९३८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७२ व जिल्हा बाहेरील ४४ अशा एकूण १ हजार ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. १६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)