उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ४९७ ने घट; ४० हजार ८१६ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख  ७९  हजार ६२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४० हजार ८१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार ४९७  ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ४९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ३५२, चांदवड १ हजार ३३६, सिन्नर १ हजार ९१७, दिंडोरी १ हजार ३३३, निफाड २ हजार ५५३, देवळा १ हजार १४२, नांदगांव ५२०, येवला ६७४, त्र्यंबकेश्वर ३५३, सुरगाणा ४४२, पेठ १४९, कळवण ८०७,  बागलाण १ हजार ६५८, इगतपुरी ३४०, मालेगांव ग्रामीण ८०१ असे एकूण १६ हजार ३७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २२ हजार ४७४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७२०  तर जिल्ह्याबाहेरील २४५  असे एकूण ४० हजार ८१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ९३४ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८४.४१ टक्के, नाशिक शहरात ८७.५४ टक्के, मालेगाव मध्ये  ८२.८१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६.३२  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार ६११  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ५४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २४५  व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ४९७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group