नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १ ऑगस्ट) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !
नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ९६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २४, बागलाण १८, चांदवड ३५, देवळा १०, दिंडोरी ३०, इगतपुरी २९, कळवण ०७, मालेगाव ३७, नांदगाव २१, निफाड ८६, पेठ ०१, सिन्नर ९५, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०३, येवला ४६ असे एकूण ४४२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५३ तर जिल्ह्याबाहेरील ०७ रुग्ण असून असे एकूण १ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ५८७ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.०२ टक्के, नाशिक शहरात ९८.०१ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार ८७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९४३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
Amazon देतंय किराणा मालावर घसघशीत सुट.. ऑफर फक्त आजच्यासाठीच मर्यादित..