जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ४२ हजार ३०९ रुग्ण कोरोनामुक्त; ४६ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख  ४२  हजार ३०९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४६  हजार ८६६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ७१ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार २२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ८४६, चांदवड १ हजार ६८०, सिन्नर १ हजार ७१५, दिंडोरी १ हजार ५५३, निफाड ३ हजार ३३६, देवळा १ हजार १३, नांदगांव ८९६, येवला ७०४, त्र्यंबकेश्वर ५०७, सुरगाणा ३७१, पेठ १९४, कळवण ७६३,  बागलाण १ हजार ५४४, इगतपुरी ४९४, मालेगांव ग्रामीण ७६८ असे एकूण १७ हजार ३८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७ हजार ६५६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६४६  तर जिल्ह्याबाहेरील १८०  असे एकूण ४६ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ९२ हजार ४०१ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८३.४८ टक्के, नाशिक शहरात ८१.४२ टक्के, मालेगाव मध्ये  ८२.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.९९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.८७ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार ४४२  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ४५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३५  व जिल्हा बाहेरील ९५ अशा एकूण ३ हजार २२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. २४ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790