नाशिक (प्रतिनिधी): सावधान… आपण जर त्रंबकेश्वर येथील पर्यटन स्थळी जात असाल तर पोलिस कारवाईला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे… त्रंबकेश्वरच्या पहिने तसेच इतर पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे….
मंदिराची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकला निसर्गाचे देखील मोठं वरदान लाभले आहे. नाशिकच्या इगतपुरी आणि त्रंबकेश्वरला पावसाळ्यात निसर्गाच्या ह्या मनमोहक आणि सुंदर अश्या रुपाकडे अनेक पर्यटक आणि निसर्गप्रेमी आकर्षित होत असतात.
यंदा देखील कोरोनाचा प्राधुर्भाव कमी झाल्याने व शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. आणि त्यामुळे आता अनेक पर्यटक हे आता इगतपुरी पाठोपाठ त्रंबकेश्वर परिसरातील पहिने, आंबोली घाट,पेगलवाडी याठिकाणी गर्दी करत आहेत…परंतु कोरोनाचे निर्बंध जरी शिथील झाले असले तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे हे देखील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
असंच काहीसं दृश्य शनिवार आणि रविवार या आठवड्याच्या शेवटच्या व सुट्ट्यांच्या दिवशी पाहायला मिळाले. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून नाशिककरांनी या ठिकाणी तोबा गर्दी केली. जणू काही आता कोरोणाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला आहे की काय असे चित्र दिसत होते. मौज मजा करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी पर्यटकांची पहिनेकडे जाण्यासाठी चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. मात्र, पोलिसांकडून ह्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे, तर रविवारच्या दिवशी पर्यटकांच्या शेकडो वाहांना पोलिसांनी परतावून लावले आहे… नागरिकांनी देखील या कोरोना काळात गर्दी करू नये असे आवाहन देखील यावेळी करण्यात येतेय…
तर दुसरीकडे त्रंबकेश्वर येथेच असलेल्या हरिहर गडावर पर्यटकांची गर्दी ही लक्षणीय आहे…पायथ्यापासून तर गडावर नागरिकांची मोठी गर्दी होतेय. त्यामुळे याठिकाणी देखील पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करून या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं देखील तितकंच गरजेचं आहे….