नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८४ हजार ०४८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६ हजार ०६ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३६३ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १९१, चांदवड ५४,सिन्नर ५६०,दिंडोरी २६४, निफाड ५६९, देवळा ३२, नांदगांव ३३१, येवला ९३, त्र्यंबकेश्वर ९५, सुरगाणा ०९, पेठ ०३, कळवण ५१, बागलाण १२९, इगतपुरी १४७, मालेगांव ग्रामीण १५३ असे एकूण २ हजार ६८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ०७९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३५ तर जिल्ह्याबाहेरील १११ असे एकूण ६ हजार ०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९१ हजार ६९१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८७.५१, टक्के, नाशिक शहरात ९३.५३ टक्के, मालेगाव मध्ये ९२.६७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७८.६४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.६६ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५८२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८५३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६५ व जिल्हा बाहेरील ३७ अशा एकूण १ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. २६ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)