नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) एकूण १३६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: ५१, नाशिक ग्रामीण: ८०, तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ८६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी ही प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790