नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १८ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १८ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १८ ऑक्टोबर) एकूण १४६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २२, नाशिक ग्रामीण: १२१, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ७२२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
पैशांसाठी अपहरण केलेल्या नाशिकच्या तरुणाची कल्याणमध्ये सुटका