नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४४ हजार ६८० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १० हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १०९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४८०, चांदवड १४३, सिन्नर ३९४, दिंडोरी १५०, निफाड ७४३, देवळा ४६, नांदगांव ३४४, येवला ११५, त्र्यंबकेश्वर ३१, सुरगाणा ०२, पेठ ०९, कळवण ७०, बागलाण २७७, इगतपुरी १३५, मालेगांव ग्रामीण २९९ असे एकूण ३ हजार २४० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार २३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४९ तर जिल्ह्याबाहेरील ४६ असे एकूण १० हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९४० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७४.५५, टक्के, नाशिक शहरात ८२.१९ टक्के, मालेगाव मध्ये ७५.७९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.५९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.८७ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ३२५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ६०८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १३२ व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण १०९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. १६ सप्टेंबर सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)