नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १६ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि १६ ऑक्टोबर) एकूण १४९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १८, नाशिक ग्रामीण: १२६, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ५३ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सध्या एकूण ७८१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गॅस कटरच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून २२ लाखांची चोरी
सामान्यांच्या खिशाला कात्री: अखेर नाशिकमध्येही डिझेल आणि पेट्रोलचे दर इतके वाढले !
नाशिक: व्यायाम करतांना तोल गेल्यामुळे गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू
Weather Alert: राज्यात पुढचे दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता