नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १६ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १६ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १६ जुलै) १५२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५६, नाशिक ग्रामीण: ९१, मालेगाव: १, जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १६ जुलै) एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ५ तर नाशिक ग्रामीण: ८ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २५७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात दुपारी ४ नंतर सर्व अस्थापना बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र या आदेशाला व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली आहे. आणि विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकासुद्धा नियम मोडणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करतांना दिसत नाहीये. दुपारी ४ नंतरसुद्धा अनेक दुकाने बिनधास्त उघडी असल्याचे चित्र आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790