नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७४ हजार ११२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ८ हजार ७६० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २१९ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६१६, चांदवड १४७ , सिन्नर ८५१, दिंडोरी २४७, निफाड ७७४, देवळा १२९, नांदगांव २४८, येवला ८२, त्र्यंबकेश्वर १७३, सुरगाणा ३५, पेठ ३९, कळवण १०४, बागलाण २१०, इगतपुरी १६२, मालेगांव ग्रामीण २६३ असे एकूण ४ हजार ०८० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १८५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३७२ तर जिल्ह्याबाहेरील १२३ असे एकूण ८ हजार ७६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ११२ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८०.४६, टक्के, नाशिक शहरात ९१.१६ टक्के, मालेगाव मध्ये ८६.५१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.८४ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५०८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७९५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६० व जिल्हा बाहेरील ३५ अशा एकूण १ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. १० ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)