नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १० मार्च २०२१) तब्बल १३३० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ६ जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ७६८, नाशिक ग्रामीण: ३८७, मालेगाव: १३८ तर जिल्हा बाह्य ३७ रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: १, नाशिक ग्रामीण: ३, जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृयू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: फ्लॅट क्र.१८, हरीकृष्णा सोसायटी,समृद्धी कॉलनी दिंडोरी रोड नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृयू झाला आहे.
सध्या कोरोनावर नाशिक शहरात उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या ३८०२ इतकी आहे तर उपचार घेऊन, बरे होऊन घरी सोडलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ७९,३२३ इतकी आहे.