जिल्ह्यात आजपर्यंत ७६ हजार ९८५ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७६  हजार ९८५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७  हजार ४८६  रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २५४ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ५३३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ५२५, चांदवड ९५ , सिन्नर ८६५, दिंडोरी २४३, निफाड ७७८, देवळा ६८,  नांदगांव १८४, येवला ८६, त्र्यंबकेश्वर ७५, सुरगाणा ०८, पेठ ३०, कळवण ७०,  बागलाण १८५, इगतपुरी ११३, मालेगांव ग्रामीण २०३ असे एकूण ३ हजार ५२८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३  हजार ५३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९५  तर जिल्ह्याबाहेरील १२० असे एकूण ७  हजार ४८६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७६ हजार ९८५  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: “केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५” या विषयावर अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांचे आज व्याख्यान 

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८३.०९,  टक्के, नाशिक शहरात ९२.४२ टक्के, मालेगाव मध्ये  ८८.५४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.२४  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.५१ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५२२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८१४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६१  व जिल्हा बाहेरील ३६  अशा एकूण १ हजार ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

(वरील आकडेवारी आज दि. १३ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790