दिलासा! नाशिकसह जिल्ह्यात पावसाचे दमदार कमबॅक, रात्रीपासून जोरदार, शेतीपिकांना जीवदान

नाशिक (प्रतिनिधी): अखेर गेल्या दोन महिन्यांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने नाशिकसह जिल्हाभरात जोरदार कमबॅक केले आहे. काल रात्रीपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुनरागमन केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. तर जिल्ह्यातील शेतीपिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असून पुढील तीन दिवस पावसाचे असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मात्र, पावसाने पुनरागमन केले आहे त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात झालेल्या पासवामुळे नागरिक सुखावले. खरीप हंगामातील पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे पाऊस पुन्हा कधी कोसळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे.

तर शहरात पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले आहे . याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून सकाळपासून अनेक ठिकाणची वाहतूक ही संथ गतीने पुढे जात आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

आज राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा खुश झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, सटाणा, इगतपुरी, देवळा, मालेगाव, मनमाड या तालुक्यांत काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाने रात्री आणि दुपारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले असून भात पिकांना संजीवनी मिळाली आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

तर नाशिक शहरात रस्त्यावर आधीपासून पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीचालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी खड्यात आदळून किरकोळ अपघात झाल्याचे बघायला मिळाले. नाशिक शहरातील नवीन नाशिक, सिडको, पवन नवर, उत्तमनगर, इंदिरानगर, पंचवटी, जुने नाशिक, नाशिकरोड परिसरात पावसाच्या आगमनाने तारांबळ उडालेली बघायला मिळाली. दुचाकीस्वरांनी मिळेल त्या ठिकाणी आडोशाला थांबून पावसापासून बचाव केला तर अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी मेन रोड परिसरात आपली दुकाने उचलून सुरक्षित स्थळी हलविली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here