जिल्ह्याला आता रोज मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सिजन

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात पन्नास हजाराहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून अनेक गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. परंतु, आता नाशिकला रोज १०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असून तसे पत्रही जिल्हा प्रशासनाला शासनाकडून सोमवारी (दि. २६) प्राप्त झाले. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत सातत्याने पाठवुरावा केला होता.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

जिल्ह्यात एकूण नऊ ऑक्सिजन साठवणूक केंद्र आहेत. यापैकी दोन केंद्राकडून प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. मात्र ते प्रमाण अत्यल्प आहे. शासनाकडून रोज केवळ ८५ मे. टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर झाला होता. त्यापैकी केवळ ७५ मे. टन ऑक्सिजन साठा नाशिकसाठी उपलब्ध होत होता. जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

अनेक रुग्णांची व नातेवाइकांची ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी वणवण सुरू असल्याने गेल्या आठवड्यात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेऊन पुरेशा ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर गोडसे यांनी गुरुवारी (दि. २२) अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वणीवरून संपर्क करून नाशिकसाठी १०५ मे. टन रोज ऑक्सिजन पुरवठ्याची अावश्यकता असल्याचे पटवून दिल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790