नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

नाशिक, दि. 27 ऑक्टोबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक कार्यालयाच्या वतीने गुरूवार 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, सुयोजित कमर्शियल, सुयोजित पार्क, मुंबई-आग्रारोड नाशिक येथे उमेदवारांसाठी जागेवर निवडीची संधी मोहीम 9, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी मि.भा. देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सदर मेळाव्यात कोणत्याही शाखेची पदवी झालेले किंवा पदवीस शिकत असलेले प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेले उमेदवारांसाठी एकूण 100 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच शासकीय रोजगार मेळाव्यात नियोक्ता व उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सेवा निशुल्क आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त यांनी केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790