नाशिक: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत कुंभमेळा निमित्ताने जेम पोर्टल व ई टेंडरिंग प्रशिक्षणाचे आयोजन

नाशिक। दि. १८ डिसेंबर २०२५: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक यांच्यामार्फत सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने 19 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत जेम पोर्टल व ई-टेंडरिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र इच्छुकांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योग विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रशिक्षणास सहभागासाठी व्यवसाय करण्यास इच्छुक उमदेवार किमान इयत्ता 7 वी उत्तीर्ण असावा, वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे, फोटो व आधारकार्ड आवश्यक आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यांनतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

तीन दिवसीय प्रशिक्षणात ई-टेंडर बघणे व भरणे, बीओक्यू प्रक्रिया, ई-टेंडर डाऊनलोड करणे, टेंडरची वेबसाईटवर नोंदणी, आवश्यक सॉप्टवेअर, डिजीटल स्वाक्षरी, एल-1 टेंडर प्रक्रिया, विक्रेता वेंडर नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, शासकीय ठेकेदार होण्यासाठी मार्गदर्शन, आयात व निर्यात परवाना, डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, उद्यम नोंदणी, दुकान कायदा परवाना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना, आयकर, जीएसटी, टिडीएस, जेम पोर्टल या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, 11 उद्योग भवन, शासकीय आय टी आय जवळ, त्र्यंबकरोड, सातपूर, नाशिक येथे अथवा मोबाईल क्रमांक 9168667165, 9168667167, 8766738318 वर संपर्क साधावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790