१९ किलो चांदीच्या सिंहासनात हिंगलाज देवीमातेचे भाविकांना होणार दर्शन!

हिंगलाज देवीमातेचा आजपासून नवरात्रोत्सव

निफाड (दीपक श्रीवास्तव): निफाड तालुक्यातील हिंगलाजनगर (खेडे) येथील हिंगलाज देवी मातेचे नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे आजपासून (दि ३ ऑक्टोबर) हिंगलाज देवी मातेचा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू होत आहे. हिंगलाज देवी माता विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हिंगलाज देवी मातेचा नवरात्रपूर्व आकर्षक रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाविकांसाठी दर्शनबारीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव कालावधीत सुमारे तीनशे महिला पुरुषांची घटी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना मुलभुत सोयी सुविधांबरोबरच दैनंदिन महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

देवीच्या 52 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणुन हिंगलाज देवीमातेचा उल्लेख केला जातो. वर्षभर हिंगलाज देवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. हिंगलाज देवी मातेचे नाविन्यपूर्ण रूप यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांना पहावयास मिळणार आहे. सुमारे 19 किलो चांदीचा वापर करून हिंगलाज देवी मातेचे सिंहासनाचे काम पूर्ण झाले आहे.

हे ही वाचा:  उत्तर महाराष्ट्रात २ दिवस मध्यम पावसाची शक्यता

नवरात्रोत्सवात हिंगलाज देवीमातेची दैनंदिन सकाळी ६:३० वा महापुजा, सकाळी ८ ते १० आणि दुपारी ३ ते ५ या कालावधीत दुर्गा सप्तशती पाठ पठण, सायंकाळी ६:४५ वा महाआरती, रात्री ९ ते ११ हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

किर्तनसेवा:
गुरुवार दि. ३ रोजी ह भ प परमेश्वर महाराज उगले, शुक्रवार दि ४ रोजी ह भ प पंडित महाराज कोल्हे, शनिवार दि ५ ह भ प वैभव महाराज राक्षे, रविवार दि ६ ह भ प महादेव महाराज राऊत, सोमवार दि ७ ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे, मंगळवार दि ८ रोजी ह भ प चांगदेव महाराज काकडे, बुधवार दि. ९ रोजी हिंगलाज देवीमातेचा यात्रोत्सव गुरुवार दि १० रोजी ह भ प एकनाथ महाराज सदगीर, शुक्रवार दि ११ रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली यांचे हरिकिर्तन होणार आहे शनिवार दि १२ रोजी नवचंडी यागाद्वारे नवरात्रोत्सव सांगता होऊन विजयादशमी साजरी केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790