नाशिक। दि. ३ मार्च २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक मार्फत भुजबळ नॉलेज सिटी (एमईटी) आडगाव, नाशिक या ठिकाणी 6 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
इयत्ता 5 वी इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांना मेळाव्यात 1 हजार 224 जागांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा- 200 पदे, बॉश लिमिटेड, नाशिक- 150 पदे, स्पार्क एच आर सोल्युशन, नाशिक- 44 पदे, टीएसपीएल ग्रुप, चाकण, पुणे -150 पदे, पीएमईए सोलर टेक प्रा.लि.- 25 पदे, गॅबरिल इंडिया लिमिटेड, नाशिक- 30 पदे, झेटकिन सर्व्हिसेस प्रा.लि. नाशिक -200 पदे, कॉसमॉस मॅनपावर प्रा.लि.गांधीनगर, गुजरात – 300 पदे, जेबीएम ऑटो, सातपूर, नाशिक – 60 पदे, सुदाल इंडस्ट्रीज लि. नाशिक -6 पदे, इक्वीटास स्मॉल फायनन्स, नाशिक -5 पदे, ऍन्ट्रॅगो बीकेएस बसडक्ट प्रा.लि. नाशिक 4 पदे, गोविंद एच.आर. नाशिक – 50 पदे, अशी एकूण 1 हजार 224 रिक्तपदांसाठी नियोक्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.
![]()

