राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

नाशिक। दि. २६ जानेवारी २०२६: राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी राज्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण जाणवले.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. सोमवार व मंगळवारी नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांसह लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक जल दिनानिमित्त ब्रह्मगिरीवर ‘स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान’; ९८० किलो प्लास्टिक कचरा संकलित

दरम्यान, रविवारी नाशिक शहरात अंशतः ढगाळ हवामान राहिल्याने किमान तापमानात सुमारे दोन अंशांची वाढ नोंदवली गेली असून ते काल १२.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790