नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.२२ जुलै) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ९७० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २२५, चांदवड ०९, सिन्नर १४८, दिंडोरी ५६, निफाड १४७, देवळा १२, नांदगांव ९६, येवला ४१, त्र्यंबकेश्वर २८, सुरगाणा ०९, पेठ ०३, कळवण ०१, बागलाण २३, इगतपुरी १३७, मालेगांव ग्रामीण ४६ असे एकूण ९८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६०८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८० तर जिल्ह्याबाहेरील १३ असे एकूण २ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १० हजार ०६४ रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे झालेले मृत्यू :
नाशिक ग्रामीण ९६ , नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २१६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८२ व जिल्हा बाहेरील १६ अशा एकूण ४१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज (दि. २२ जुलै) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)