नाशिक: मुलाच्या मदतीने पत्नीने केला नवऱ्याचा खून; दारूच्या व्यसनाला कंटाळून केले कृत्य

नाशिक (प्रतिनिधी): दारूच्या व्यसनाला कंटाळून मुलाच्या मदतीने पत्नीने नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे पत्नीने मुलाच्या सहाय्याने पतीचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पत्नी व मुलाला अटक केली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

मन सुन्न करणाऱ्या या घटनेबाबत माहिती अशी, येथील वृंदावननगर येथे राहणारा संजय गणेश गायकवाड (३७) हा रात्री नेहमीच दारू पिऊन घरात पत्नी व मुलांना मारहाण करीत असे.

गुरुवारी (ता.५) रात्री अकराच्या सुमाराला संजय दारू पिऊन आला व त्याने पत्नी मुलाला मारहाण केली. सततच्या मारहाण व त्रासाला कंटाळलेल्या पत्नी उषा हिने दारूच्या नशेत असलेल्या संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

मुलगा अविनाश याने नायलॉन दोरीने गळफास लावून संजयचा खून केला. संजयची आई मीराबाई हिने आपल्या मुलाची हत्या झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल केल्याने पोलिसांनी मायलेकाला अटक केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790