नाशिक: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकाला दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक (प्रतिनिधी): वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर आरोपी प्रफुल्ल गंगावणे (वय: २१, राहणार: गोवर्धन, गंगापूर गाव, नाशिक) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केल्याची घटना २०२३साली उघडकीस आली होती.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून २४ लाखांना गंडा

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात प्रफुल्ल यास न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी बुधवारी (दि.१५) दोषी धरले. त्यास दहा वर्षांची सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हे ही वाचा:  नाशिक: रथसप्तमीनिमित्त रामकुंडावरील सूर्यमंदिर आज भाविकांसाठी खुले

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रफुल्ल याने २० मार्च २०२२ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत फिर्यादीच्या पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच शहरातील व त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील विविध लॉजमध्ये घेऊन जात वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790