नाशिक: खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप !

नाशिक (प्रतिनिधी): खुनाच्या गुन्ह्यात एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मंगळवारी (दि. ८) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी ही शिक्षा ठोठवली. किरण ऊर्फ स्वप्नील लक्ष्मण वाघ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, १ जुलै २०१८ रोजी फ्रिसिगन ऑटो कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी फिर्यादी हे कंपनीत जात असताना पार्किंग कामगार किरण ऊर्फ स्वप्नील वाघ, राकेश वाघ व हिरामण थोरात यांनी मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादी घाबरुन कंपनीत पळाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

फिर्यादीचा चुलतभाऊ दिनेश जाधव हा आरोपींना बघण्याकरिता कंपनीबाहेर आला असता आरोपी किरण वाघने धारदार शस्त्राने त्याच्या पोटात वार केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790