नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील नाशिकमधील चांदवड येथील धोतरखेडेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षांचा चिमुकला आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात जास्त पैसे खर्च झाले. याचाच राग डोक्यात धरत मुलाच्या वडिलांनी असं काही कृत्य केलं की गाव हादरून गेलं आहे. मंगश बेंडकुळे असं या निर्दयी बापाचे नाव आहे. ही घटना संपूर्ण पंचक्रोषीमध्ये चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?:
मुलगा आजारी पडल्यानंतर त्याच्यावर दवाखान्यात औषधोपचारासाठी जास्त पैसे खर्च झाल्याचा राग येऊन जन्मदात्या पित्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला छताला उलटे टांगले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केल्याचा संताप जनक प्रकार चांदवडच्या धोतरखेडे येथे समोर आला आहे. मुलाला मारहाण करीत असताना त्याला वाचविण्यासाठी आई पुढे आली असता, तीला देखील या सनकी व्यक्ती ने मारहाण केल्याचे समोर आले आहे.या प्रकारणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मंगेश बेंडकुळे (पिता) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती वादामधून मुलांना मारहाणीच्या घटना घडलेल्या आपण पाहिल्या असतील. असाच काहीसा हा प्रकार असून याबाबत पोलिसांनी चौकशी करत माहिती दिली आहे. पती,पत्नीत वाद झाल्यामुळे घरगुती भांडणातुन हा सर्व प्रकार घडला असून मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी सांगितलं.