नाशिक: कार व कंटेनरच्या भीषण अपघातात नाशिकच्या ५ युवकांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): मनमाड जवळील अनकवाडे रेल्वे उड्डाण पुलावर कंटेनर-स्विफ्ट कारची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५ तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे…

रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहे.

मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असतांना हा भीषण अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांचे शव मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

अवकाळी व पाऊस व रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबविण्यास अडथळा येत होता. रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्याने या मार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू होती.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790