नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या आवनखेड येथे काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अवनखेड परिसरात घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी समाधान बकाराम कोकाटे (वय १५) हा इयत्ता नववीत शिकत होता.

दरम्यान, समाधान हा आपल्या काही मित्रांबरोबर तेथील एका वाघदेवनगर वस्तीजवळ असलेल्या गावतळ्यात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी समाधानला तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

त्याच्या या मृत्यूने कोकाटे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790