
नाशिक (प्रतिनिधी): सर्व मतदारसंघाची जाण असेल अशा कार्यक्षम उमेदवारालाच आम्ही मत देणार. पक्षाशी, महायुतीशी एकनिष्ठ व्यक्ती निवडून आणणार, आम्हाला उच्चशिक्षित आमदार पाहिजे, पक्ष बदलून निवडणूक लढविणाऱ्या दलबदलू व्यक्तीला मत कशासाठी, असा सवाल युवा नवमतदारांनी केला. युवाशक्ती व सर्वजण महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र प्रभाग १२ मध्ये शनिवारी (दि. ९) दुचाकी रॅलीतून दिसून आले.

प्रारंभी ग्रामदेवता कालिकामातेचे दर्शन व शंकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कमळ चिन्हाने सजवलेल्या रथावर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे होत्या. त्यांच्या समवेत गुजरातचे आ. अमित ठक्कर, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते अभय छल्लानी, नरेंद्र सोनवणे, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय गांगुर्डे, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता जाधव, चित्रेश वस्पटे, विनोद येवलेकर उपस्थित होते.
![]()


