नाशिकमध्ये महिनाभरातच डेंग्यूचे २६१ रुग्ण !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून सप्टेंबरच्या गेल्या महिनाभरातच डेंग्यूचे १०६६ संशयित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी २६२ जणांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यामुळे डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता ५२२वर गेला आहे. दरम्यान, रुग्णसंख्येचा हा सरकारी आकडा असून प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरीपटीने अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

वाढत्या रूग्णसंख्येमुळे नाशिक शहर डेंग्यूचा नवा हॉटस्पॉट ठरला आहे. शहरात जुलैअखेरपर्यंत डेंग्यू रूग्णांचा आकडा १४४ इतका होता. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर डेंग्यू रुग्णसंख्या कमी होणे अपेक्षित होते. परंतू या आजाराचा प्रादुभार्व वाढतच गेला. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने कहर केला आहे. गेल्या महिनाभरात शहरात डेंग्यूचे १०६६ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचे रक्तनमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राप्त अहवालांपैकी २६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता ५२२ पार झाला आहे. हा सरकारी आकडा असला तरी, खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

नाशिकमध्ये वाढत असलेल्या डेंग्यू रुग्णांबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला गेल्या महिन्यात देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही रुग्णसंख्येचा आलेख वाढतच असल्याने डेंग्यू निमूर्लनाच्या उपाययोजना कागदावरच असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here