नाशिक (प्रतिनिधी): एका सेवा निवृत्त अभियंत्याला मुंबई पोलिस असल्याचे भासवत तुमच्या मोबाईलचा मनी लॉड्रींग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगत तब्बल २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तुमची मालमत्ता तपशील व स्थावर मालमत्ता माहिती द्यावी लागले असे सांगत बँक खात्यातील रक्क ईडीच्या खात्यात जमा करण्यास सांगून २० लाख ११ हजारांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ७१ वर्षीय सेवा निवृत्त अभियंत्याने तक्रारीनुसार, दिलेल्या मोबाइलवर अनोळखी नंबरहून फोन आला. नेट सुरु ठेवण्यास सांगत प्रदीप सामंत नावाच्या व्यक्तीने अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवत तुमचा मोबाईल क्रमांकातील नरेश गोयेल विरोधात मनी लॉड्रींग प्रकरणात सहभाग आढळून आला आहे.
तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सांगत तुमचा आर्थिक तपशील व स्थावर मालमत्ता याची माहिती ईडीच्या मॅडमांना सांगावी लागेल. ईडी कडून बोलणारी आकांक्षा अग्रवाल या महिलेने तक्रारदाराला तुमच्या बँकेतील रक्कम ईडीच्या खात्यात जमा करा अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येईल अशी धमकी दिली. तक्रारदाराने संशयितांच्या बँक खात्यात २० लाख ११ हजारांची रक्कम भरणा केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.