कॉफी शॉपच्या नावाखाली सुरु होते अय्याशीचे अड्डे; पोलिसांचा छापा !

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर शहरातील चौदाचौक वाडा परिसरातील सांगळे कॉम्प्लेक्स आणि सिन्नर बसस्थानक परिसरात असलेल्या कॉफी शॉपमध्ये अवैद्य धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तीन कॉफी शॉप उद्ध्वस्त केले आहेत.

या कॉफी शॉपमध्ये तब्बल ५० ते ६० वापरलेले कंडोम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काही वर्षांपासून सिन्नर शहरात ठिकठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. याकडे सिन्नर पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका सुजाण नागरिकाने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे तक्रार केल्याचे कळते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

त्यानंतर उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने थेट सिन्नर गाठत सांगळे कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या मजल्यावरील तीन कॉफी शॉपवर छापा टाकला. अचानक छापा पडल्याने कॉफीशॉप चालकांची धांदल उडाली. त्यांनी तेथून पळ काढला.

कॉफी शॉपमध्ये ९ ते १० अल्पवयीन मुले-मुली आढळून आली. या कॉफी शॉपमध्ये छोटे-छोटे कंपार्टमेंट करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यात बसण्यासाठी सोफ्याची व बेडचीही व्यवस्था करण्यात आली होती. अंधारमय असणाऱ्या या कंपार्टमेंटमध्ये मुले व मुली अश्लील चाळे करीत असल्याचे यातून उघड झाले. कॉफी शॉप केवळ नाव असून, या शॉपमध्ये कॉफी किंवा चहाचा कुठलाही प्रकार दिसून आला नाही. या कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी तासाला २०० ते ३०० रुपये आकारण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

कॉफी शॉपची झडती घेतली असता येथे तब्बल ५० ते ६० वापरलेले कंडोम सर्वत्र पडल्याचे दिसून आल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत गिलबिले, विनोद टिळे, शांताराम नाठे, दीपक अहिरे, दिनेश बागूल, संदीप नागपुरे यांनी तिन्ही कॉफी शॉपमधील सर्व साहित्य उद्ध्वस्त केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गुन्हे शाखेच्या पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील कॉफी शॉपचालकांचे धाबे दणाणले आहे. सामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here