नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कत्तल करण्यासाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अश्विन सेक्टर, अंबड येथे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली. टेम्पोमधून गाय व दोन वासरांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टेम्पोमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाचे गुलाब सोनार यांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून संशयित एमएच ४३ एडी ४९५१ या क्रमांकाचे वाहन थांबवले. वाहनात पाठीमागे एक गाय, दोन वासरे निर्दयीपणे कोंबलेले आढळले. चालकाला याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की गाय व वासरे हे अशोक सुनील नेटावटे (वय: ३२, पिंपळद, नाशिक) याने अजीम नजीर शेख (वय: २९, राहणार: रंगरेजमळा, इंदिरानगर, नाशिक) याला विकले असून कत्तलीकरिता घेऊन जात आहे.
पोलिसांनी चालक अनिल बाळू मुर्तडक (रा. इगतपुरी), अशोक नेटावटे, अजिम शेख या संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.