नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली असून, तसा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला आहे. यासंदर्भात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळ यांना मध्यंतरी अशाच प्रकारे पुण्याहून एका व्यक्तीने मोबाइलवरून धमकी दिली होती. नंतर पोलिसांनी त्याला अटकही केली होती. आता फोनवरून नव्हेतर, व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे धमकी दिली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मोबाइल क्रमांक ९०७५०१५८७५ यावरून भुजबळ यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला. त्यात ‘तू जास्त दिवस राहणार नाही, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही, तू नीट राहा. नाहीतर, तुला बघून घेईन,’ अशी धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात अंबादास खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.
![]()


