नाशिक। दि. २१ डिसेंबर २०२५: धुळेकडून नाशिककडे येणाऱ्या कारमधून अवैध गुटखा जप्त करण्यात आला. ट्रक टर्मिनल पोलिसांनी महामार्गावर ट्रक टर्मिनल येथे ही कारवाई केली.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार देवराम सुरंजे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, रात्री ११.४० वाजता महामार्गावर गस्त करत असतांना धुळेकडून नाशिककडे येणाऱ्या कारमधून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळाली.
पथकाने सापळा रचून संशयित कार (एमएच १५ एचयु ८४३९) थांबवली. कारची तपासणी केली असता पांढऱ्या व खामी १० गोण्यात २ लाख ९५ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. कारचालक गजानन वाणी (रा. महाकाली चौक, सिडको) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयित वाणी हे अवैध गुटखा विक्री करत असल्याचा संशय आहे. धुळेतून गुटखा तस्करी करत सिडकोतील घरी साठा करण्याकरता नेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
![]()

