नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गुन्हे शाखा युनिट १ ने चार चोरट्यांना दोन वेगळ्या घटनांमध्ये जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरी झालेल्या दुचाकीसह लॅपटॉप व मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार विशाल काठे, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे यांच्या पथकाने शीतलादेवी मंदिरासमोर सापळा लावून सौरभ शिवाजी बनकर (रा. समतानगर, आगर टाकळी), अजय पुंडलिक बोराडे (रा. गुरुप्रसाद सोसायटी एन.के. नगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एम.एच. १५ डी.एफ. ४३२९ या क्रमांकाची दुचाकी हस्तगत करण्यात आली.
दुसरी कारवाई पोलिस हवालदार प्रशांत मरकड त्यांना मिळालेल्या माहितीनुसार केली. हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, धनंजय शिंदे, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, राम बर्डे, यांच्या पथकाने आसाराम पुलाजवळील विश्वास टर्फच्या बाजूला सापळा रचला. आदित्य प्रकाश देवरे (रा.राधे संकुल सोसायटी, व्दारका), उर्जीत कुंदन कुलकर्णी (रा. राणेनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी लॅपटॉप व मोबाइल फोन चोरी केल्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली.