
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट १ ने भद्रकालीत ४५ हजार रुपयांचा मांजा जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा, युनिट क.-१ चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, भद्रकाली येथे भंगार दुकानाच्या वरील इमारतीच्या मोकळया जागेत आडोशाला, सोनेरी झोपडीपटटी जवळ एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विकी करण्यासाठी येणार आहे.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ च्या पथकाने भद्रकाली येथे भंगार दुकानाच्या वरील इमारतीच्या मोकळया जागेत आडोशाला, सोनेरी झोपडीपटटी जवळ सापळा लावला. यावेळी नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम संशयित शाहरूख अमीर शहा, (वय-२७वर्षे, रा-३८९२, मिरा दातार चौक, अजमेरी मस्जिद, जुने नाशिक) याला ताब्यात घेवुन त्याच्याकडून २७,०००/- रू. किंमतीचे मोनोकाईट कंपनीचे नायलॉन मांजा असलेले २७ गट्टु व १८,०००/- रू. किंमतीचे मोना फाईटर कपंनीचे नायलॉन मांजा असलेले १८ गट्टु एसे एकुण ४५,००० रुपये किमतीचे ४५ नायलॉन मांजा गट्टु हस्तगत केले आहेत.
त्याच्याविरूध्द पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ चे कलम ५,१५, सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे २२३,२९२,२९३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, संदिप भांड, विशाल काठे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रविंद्र आढाव, पोलीस नाईक विशाल देवरे, राम बर्डे, आप्पा पानवळ, मनिषा सरोदे, अनुजा येलवे चा. पोलीस हवालदार सुकाम पवार यांच्या पथकाने केली.
![]()


