नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक भांडण रागातून सोडवण्याचा चाकूहल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुवारी (दि. २५) जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी यांनी ही शिक्षा सुनावली. गोटीराम बाळू जगताप (रा. आंबेडकरनगर) शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सूरज केवट यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. याचा राग आल्याने तरुणावर आरोपी गोटीराम जगताप याने केवटवर चाकूहल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक जे. के. गोसावी यांनी आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करत रमाबाई दोषारोपपत्र दाखल केले असे होते. खटल्याची सुनावणी सुरु होती.
अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, १३ एप्रिल २०१९ रोजी रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी येथे आरोपी गोटीराम जगताप, आकाश पानपाटील, एक महिला आणि ढवळ्या ऊर्फ राहुल कदम यांचे आपापसात भांडण सुरू होते. फिर्यादी न्यायालयाने पंच, साक्षीदार, फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेले पुराव्यास अनुसरून आरोपी गोटीराम जगताप यास ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले.