लग्नातील नवरदेव व वऱ्हाडींनी मास्क न लावल्याने कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): सध्या लग्न समारंभ जोरदार सुरू आहेत. लग्नाच्या गडबडीत लोकांनी कोरोनावरील सगळे निर्बंध धाब्यावर बसवले आहेत. असेच काल (दि.२५) एका विवाह सोहळ्यामध्ये नवरदेवाची मिरवणूक सुरू असताना नवरदेवासहीत एकानेही मास्क न लावल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी वऱ्हाडी मंडळींवर कारवाई केली. व त्यांना एक हजारांचा दंड करून जनजागृती करण्यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: डॉक्टरने मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत! सिव्हिलमध्ये नक्की काय घडलं?

वऱ्हाडी मंडळी आनंदात व जल्लोषात असताना अचानक थांबा असा आवाज आला. वऱ्हाड मागे वळून बघते तर त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिसले. लग्न समारंभात लोकांनी मास्क न लावल्याने कारवाई केली. हा प्रकार काठे गल्ली परिसरातून विवाहाच्या मिरवणुकीदरम्यान घडला. पोलिसांनी प्रथम पाच जणांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे एक हजारांचा दंड वसूल केला. व पथका कडूनच सर्वांना मास्क वाटप करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: तीन लाईट, एक पंखा, बिल आलं तब्बल चार लाख रुपये; बांगडी विक्रेत्याला महावितरणचा 'शॉक'

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790