गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंगची सुविधा; जाणून घ्या सविस्तर

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना विषाणूच्या साथीमुळे या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गणेश विसर्जनाचे वेळी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि फॉक्सबेरी टेक्नोलॉजिज् यांच्या वतीने ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्याने व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात येत आहे. २५  ऑगस्ट २०२०, २६ ऑगस्ट २०२०, २७ ऑगस्ट २०२०, १ सप्टेंबर या दिवसांकरता बुकिंगची सुविधा सुरु राहणार आहे. या उपक्रमाला नाशिककर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून आजपर्यंत ११००पेक्षा अधिक नागरिकांनी टाईमस्लॉट बुकिंग केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादा भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ

विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html  या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Ganpati Visarjan Booking हा पर्याय निवडल्यानंतर आपल्या भागातील कृत्रिम तलावांची किंवा मूर्ति स्वीकृती केंद्रांची यादी पहावी. गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन स्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: गोणीत आढळलेल्या महिलेच्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790