नाशिक: अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टरमुळे वाढेल सैन्य दलाची ताकद- लेफ्टनंट जनरल विनोदकुमार नांबियार

कॉम्बॅट एव्हिटर्स, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टरसह पायलोटेड एअरक्रॉफ्ट सिस्टिम इंटर्नल पायलट कोर्सचा दीक्षांत समारंभ संपन्न

नाशिक (प्रतिनिधी): भारतीय सैन्य दलाची एक शाखा असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये भविष्याचा वेध घेऊन विविध बदल घडविण्यात येत आहेत. या माध्यमातून भारतीय सैन्य दल आत्मनिर्भर होतानाच आगामी काळात एएच -64, अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशाने देशाची लष्करी ताकद वाढलेली दिसेल, असा विश्वास आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोदकुमार नांबियार यांनी येथे केले. 

नाशिक रोड स्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे कॉम्बॅट एव्हिटर्स कोर्स ४२, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रॅक्टर कोर्स ४१ आणि बेसिक रिमोटली पायलोटेड एअरक्राफ्ट सिस्टिम इंटर्नल पायलट कोर्स ४ चा दीक्षांत समारंभ सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्कूलचे ऑफिशिएट कमांडंट ब्रिगेडियर सत्यवीर शौकीन, नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी लेफ्ट. जनरल श्री. नांबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. तसेच ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर ध्रुव, रुद्र यांची विविध थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: पोलिसांनी केला २५ किमी सिनेस्टाइल पाठलाग; गांजा तस्करीचा डाव उधळला; २८ किलो गांजा जप्त !

लेफ्ट. जनरल नांबियार म्हणाले की, आर्मी एव्हिएशनमुळे निश्चितपणे आपल्या लष्कराला ताकद मिळाली आहे. तांत्रिक पातळीवरही आपल्या वैमानिकांनी जागतिक पातळीवरील उच्चतमता राखली आहे. येत्या काळात लढाऊ हेलिकॉप्टरशिवाय प्रीडेटर (MQ-9B) देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आपली लढाऊ क्षमता अधिक वृद्धींगत होणार आहे. आधुनिकीकरण करण्यासोबतच पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचे आपले धोरण आहे. देशातील सर्व तळांसोबतच सीमेवरील तळांवरही पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा (CATS) कायापालट निश्चितच आनंददायी आहे. आज कॅटस एका प्रशिक्षण वर्षात 17 अभ्यासक्रम चालवते. गेल्या दशकभरात, कॅटस् भारतीय सैन्याच्या ‘प्रीमियर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये बदलले आहे. नजीकच्या भविष्यात प्रशिक्षण क्षमतेचा अधिक विस्तार केला जाणार आहे, असे सांगतानाच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार वैमानिकांनी करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

तरुण वैमानिक हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे उड्डाण मोहिमा या नेहमी सुरक्षितता प्राधान्य लक्षात घेऊन केल्या गेल्या पाहिजेत. येत्या काळात फ्लाइंग सिम्युलेटर विकसित करण्यावर आणि ‘आत्मनिर्भर-भारत’ उपक्रमावर देखील लक्ष केंद्रित केले जात आहे. नवीन ऑपरेशनल संकल्पना प्रकट करण्यात कॅटस देखील आघाडीवर आहे. ॲडव्हान्स कॉम्बॅट ट्रेनिंग कोर्समध्ये मानवरहित संघ प्रशिक्षणाचा यशस्वी परिचय हे असेच एक उदाहरण आहे. सध्या भारतीय सैन्यात प्रगतीपथावर असलेल्या एकूण प्रशिक्षण परिवर्तन आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन प्रक्रियेत कॅटस प्रभावीपणे योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. श्रीमती डोग्रा, कॅप्टन अमित रघुवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची सक्तमजुरी

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा गौरव:
या समारंभात नेपाळसह नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली. कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी कॅप्टन सक्षम गोस्वामी यांना प्रदान करण्यात आली. एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी कॅप्टन हेन्री रजनी यांना प्रदान करण्यात आली. आरपीएएस (RPAS) अंतर्गत पायलट कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी मेजर अरविंदर पुरी यांना आणि ऑब्झर्व्हर स्ट्रीममधील ट्रॉफी मेजर तुफैल अहमद यांना देण्यात आली.

187 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790