नाशिकच्या विकेंड लॉकडाऊनबद्दल महत्वाची बातमी…

नाशिकच्या विकेंड लॉकडाऊनबद्दल महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात वीकेंड लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या घटत असल्यानं वीकेंड लॉकडाऊन हटवण्याची मागणी स्थानिक व्यापार्‍यांकडून केली जातेय. या मागणी बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मकता भूमिका घेतलीय. यापुढे शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दूकानं खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आपण राज्य सरकारला केली असल्याची माहिती पालकमंत्री भुजबळांनी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: शेल्टर 2024:9000 कुटुंबांनी दिली प्रदर्शनास भेट; 60 कुटुंबांची झाली गृह स्वप्नपूर्ती

जिल्हाधिकारी कोरोना संदर्भात शुक्रवारी (दि. २३ जुलै) झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेतच दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मॉल्स, थिएटर्स अद्याप बंदच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे याआधी लागू केलेल्या निर्बंधांमध्ये कुठलेही बदल आज करण्यात आलेले नाही. म्हणजेच शुक्रवारी सोशल मिडीयावर विकेंड लॉकडाऊन काढल्याबद्दलच्या अफवांचे जे मेसेज फिरत होते, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे सध्या तरी शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन हा कायम असणार आहे.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790