हॉटेल ज्युपिटर येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभ सोहळ्यात मनपा आणि पोलिसांची कारवाई

लग्न समारंभात पोलिस बघताच वऱ्हाडिंची एकच धावपळ,काही रस्त्यावर तर काही ATM मध्ये बसले लपून..

कोरोना बाबतच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर आता शासनाकडून कडक कारवाई सुरु केली आहे. हॉटेल ज्युपिटर येथे लग्न समारंभ चालू होता. दरम्यान सोशल डिस्टनसिंगचे पालन न करता लग्न समारंभ चालू असल्याचे निदर्शनास आले.

महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तीकरित्या ही कारवाई केली आहे. यावेळी नवरदेवाच्या वडिलांकडून 5000 तर नवरीच्या वडिलांकडून 5000 आणि हॉटेल मालकाला 5000 असा पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यावेळी वऱ्हाडी मंडळीची चांगलीच पळापळ सुरू झाली होती, काही मंडळी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर पळाले तर काहींनी हॉटेलच्या बाहेर असलेल्या एटीएम मध्ये लपल्याचे दिसून आले.